मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करूनही Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासाठीचं उपोषण मागे का घेत नाहीत?

गेल्या १० दिवसांपासून अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत ही त्यांची प्रमुख मागणी…6 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजामकाळातील नोंदीनुसार कुणबी दाखले देणार असल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर मनोज जरांडे पाटील आपलं उपोषण मागे घेतील अशा शक्यता बोलून दाखवली जात होती. गुरूवार म्हणजे आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी ते उपोषण मागे घेतील अस बोललं गेलं, पण त्यांनी उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं. सोबतच वंशावळी या शब्दावर आक्षेप घेत हा एक शब्द काढावा आपण उपोषण मागे घेतो असही सांगितलं… साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे शासनाने निर्णय घोषीत करूनही मनोज जरांडे पाटील आत्ता मुद्दामहून हेकेखोर भूमिका घेत आहेत का? की जरांडे पाटील बोलतायत ते योग्य असून शासन आपल्या निर्णयात शब्दांचे खेळ करत वेळ मारून नेत आहे. नेमकं होतय काय? समजून घेवूया या व्हिडीओतून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *